
नगर : आखाती युद्धाच्या झळा भारतीयांना सोसाव्या लागत आहेत. भारतात घरगुती गॅस, पेट्रोलियम पदार्थ व खतांची टंचाई (LPG Cylinder Shortage) भासू लागली आहे. अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) गॅस एजन्सीच्या दारात ग्राहकांच्या रांगा (Queues of customers at gas agencies)दिसत आहेत. मात्र, ज्या ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅस घरात मिळतो त्या ग्राहकांना युद्धाच्या झळा कमी बसत आहेत. अहिल्यानगरमधील १६ हजार ग्राहकांनी पाईपलाईनद्वारे गॅस घरात (Gas in the home via pipeline)येण्याची तयारी केली. मात्र, त्यांच्या दारात गॅस पाईपलाईन आलीच नाही. महापालिकेने २०१९मध्ये गॅस पाईपलाईन कामाला मंजुरी देऊनही ही पाईपलाईन नगरकरांच्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही. काय होतं यामागील कारण चला जाणून घेऊ…
नक्की वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत
अहिल्यानगरमधील गॅस पाईपलाईनला नगरसेवकांचा विरोध (LPG Cylinder Shortage)
केंद्र सरकारने युद्धाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा घाट घातला आहे. याला अहिल्यानगरमधील नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. मागील दोन वर्षांत शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था होईल, असा युक्तीवाद केला जात आहे. मात्र, सहा वर्षांपूर्वीच महापालिकेने गॅस कंपन्यांना गॅस पाईपलाईन करण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी हे काम का झाले नाही, असा प्रश्न विचारले जात आहेत.केंद्र सरकारच्या श्रीगोंदे- अहिल्यानगर गॅस पाईपलाईनचा प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. हा प्रकल्प होईल या आशेने अहिल्यानगरच्या १६ हजार ग्राहकांनी घरात गॅस मीटर बसवून घेतले. मात्र, अहिल्यानगरमधील नवनागापूरच्या अवघ्या २९० घरांतच पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचला.
अवश्य वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?
केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम मंत्रालयाचा ग्राहकांना थेट पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशातील ‘नॅशनल गॅस ग्रीड’ अंतर्गत विशाखापट्टणम ते गुजरात या मुख्य २४ इंची पाईपलाईनमधून अहिल्यानगर शहरातील घरगुती ग्राहकांना थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट शहराला सुरक्षित, स्वस्त आणि नियमितपणे गॅस पुरवणे हे होते. या प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर शहरासाठी निश्चित केलेल्या १६ हजार ग्राहकांच्या घरात थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी “मीटर’बसले. मात्र गॅस पुरवठा केवळ २९० ग्राहकांनाच होत आहे. थेट पाईपलाईनद्वारे गॅस घेणारे ग्राहक देखील नागापूर औद्योगिक वसाहतीतील आहेत.१६ हजार ग्राहकांच्या घरात गॅस मीटर येऊन ही ग्राहक “गॅसवर’च आहेत. वास्तविक नागापूरऐवजी अहिल्यानगर शहराला अगोदर पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होणे अपेक्षित होते. कारण शहरातील गॅस पाईपलाईन टाकण्याचे व मीटर बसवण्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले होते. तरीदेखील पाईपलाईनचा गॅस शहरांतर्गत परिसराला मिळाला नाही.
अहिल्यानगर आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या शासकीय कंपनीद्वारे हा प्रकल्प राबविला जात आहे. श्रीगोंद्यातील मुख्य स्टेशनच्या २४ इंची पाईपलाईनला १६ इंची पाईपलाईन जोडून अहिल्यानगरला पाईपलाईनद्वारे गॅस पुरविला जाणार आहे. त्यासाठी केडगावमध्ये एक प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्याची अहिल्यानगरच्या प्रभाग ८मध्ये एक टाकी तयार करण्यात आली आहे. अशा शहरातील प्रत्येक प्रभागात एक टाकी बसवायची आहे. त्यासाठी बीपीसीएल कंपनीला सहा बाय पाच मीटर मोकळा भूखंड महापालिकेकडून किमान २५ वर्षांच्या करारावर पाहिजे आहे. गॅस पुरवठ्यासाठी श्रीगोंदे ते अहिल्यानगर शहर अशी टप्प्याटप्प्याने पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाचे मदर स्टेशन ‘केडगाव’ बायपास हे आहे. श्रीगोंदा येथे मुख्य विशाखापट्टणम – गुजरात या २४ इंची लाईनला जोड देऊन १६ इंची उपपाईपलाईन जोडण्यात आली आहे.
श्रीगोंदा येथून अरणगाव मार्गे आलेली ही लाईन केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील ‘मदर स्टेशन’ (मुख्य वितरण केंद्र) येथे पोहोचली आहे. केडगाव, व्हीआरडी चौक आणि डीएसपी चौक मार्गे ४ इंची स्टील पाईपलाईन मुख्य रस्त्यांच्या भूमिगत भागात टाकण्यात आली आहे. मध्य अहिल्यानगर शहर, सावेडी उपनगर, नवनागापूर, भिंगार, कल्याणरोडसह या भागातील मुख्य रस्त्यांच्या बाजूने १२५ एमडीपी तर शहरातील व उपनगरातील गल्ल्यांमध्ये ३३ एमडीपी या पाईपलाईनचे जाळे विस्तारले गेले आहे. २० हजार ग्राहकांना डिसेंबर २०२३ मध्येच थेट पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार होता. मात्र, आज तागायत हे काम पूर्ण झालेले नाही.
२०१९मध्ये महापालिकेकडून परवागी घेतल्यावर बीपीसीएल कंपनीकडून २०२२ पासून अहिल्यानगर शहरात रस्ते खोदकाम करून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. सद्य स्थितीत अमेरिका- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होत आहे, तेव्हा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असता तर आज नगरकरांना सिलेंडरसाठी रांगा लावण्याची गरज भासली नसती. १६ हजार घरांत गॅस मीटर बसूनही केवळ नवनागापूर परिसरातील २९० ग्राहकांच्या घरांतच थेट पाईपलाईनचा गॅस पोहोचला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत शहरातील २० हजार घरांना गॅस देण्याचे लक्ष होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही. विशाखापट्टनम-गुजरात गॅस पाईपलाईनद्वारे सद्यस्थितीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण- डोंबिवली, पुणे, पिंपरी- चिंचवड येथे गॅस पुरवठा केला जात आहे. अहिल्यानगर शहरात १ लाख ८ हजार गॅस ग्राहक आहेत. त्यातील १६ हजार ग्राहकांनी गॅस मीटर बसवून घेतला आहे.
थेट पाईपलाईनद्वारे गॅसचे फायदे काय? (LPG Cylinder Shortage)
सध्या ग्राहकांना १४.२ किलो वजन असलेले गॅस सिलेंडर दिले जातात. या गॅस सिलेंडरचा १५०० मिलीबार (अत्यंत उच्च हवेचा दाब) असतो. या गॅसला गळती लागल्यास आगीमुळे मोठी जीवित किंवा वित्तहानी होऊ शकते. पाईपलाईनच्या गॅसचा केवळ २१ मिलीबार (हवेचा दाब) आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना जरी घडली तरी जीवितहानी किंवा वित्तहानी होत नाही. शिवाय युनिट प्रमाणे २४ तास थेट ग्राहकांना गॅस पुरवठा होणार होता. शिवाय नगरकरांना युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासली नसती.
पाईपलाईनच्या गॅस साठी सुरक्षित ठेव म्हणून ग्राहकांना बीपीसीएलकडे ६,५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा करावा लागेल. त्यानंतरच गॅस पुरवठा सुरू केला जातो. गॅसचा वापर युनिटनुसार मोजला जातो व वापरलेल्या गॅसचेच पैसे द्यावे लागतात. सद्यस्थितीत ९३६ ते ९६० रुपये घरगुती गॅस सिलेंडरचा दर आहे. पाईपलाईनचा गॅस यापेक्षा स्वस्त राहणार आहे. युनिटप्रमाणे १३६.२ रुपये या पाईपलाईनच्या गॅसमुळे नगरकरांचे वाचणार होते. प्रामुख्याने एलपीजी गॅस ग्राहकांना ७५ रुपये किलो पडतो तर पीएनजी गॅस ५८ रुपये किलो पडला असता पीएनजीमुळे नगरकरांचे ते १३६ ते १६० रुपये वाचले असते. पीएनजीमुळे किलोमागे सुमारे २२ टक्के बचत झाली असती.


