LPG Price Cut:मोठी बातमी!व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ‘इतकी’ कपात

0
LPG Price Cut:मोठी बातमी!व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' कपात
LPG Price Cut:मोठी बातमी!व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' कपात

LPG Price Cut : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थव्यवस्थेत बरेच बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. दरवर्षी तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि सीएनजी (CNG) पीएनजीच्या (PNG) किमतीत बदल करत असतात. त्याच अनुषंगाने ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आता ४१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आज म्हणजेच १ एप्रिल (1rst April) पासून लागू असणार आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये उभारली गेली पुस्तकांची गुढी!  
या नवीन कपातीनंतर,१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत १७१४. १५ रुपये झाली आहे, जी पूर्वी १७५५. ५० रुपये इतकी होती. परिणामी या नव्या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे.

अवश्य वाचा : बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण;सुरेश धस यांचा दावा!  

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात (LPG Price Cut)

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता १७६२ रुपये झाली असून ती ४१ रुपयांनी कमी झाली आहे. तर कोलकातामध्ये ४४ रुपये ५० पैशांनी कमी झाल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत १८६८ रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ती आता १७१३ रुपये ५० पैसे झाली आहे.

चेन्नईमध्ये ४३ रुपये ५० पैशांच्या कपातीनंतर सिलिंडरची नवीन किंमत १९२१ रुपये ५० पैसे झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमत सध्या दिल्लीमध्ये ८०३ रुपये, मुंबईमध्ये ८०२ रुपये ५० पैसे, कोलकातामध्ये ८२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८ रुपये ५० पैसे उपलब्ध आहे. ९ मार्च २०२४ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे लागणार?(LPG Price Cut)

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात करण्यात आली असताना,घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कपात केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here