LPG Price Hike : आजपासून एलपीजी गॅस महागला !

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder Hike) आजपासून महाग झाला आहे. यामुळे महागाईने (inflation) होरपळलेल्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

0
आजपासून एलपीजी गॅस महागला !

LPG Price : नगर : आजपासून म्हणजेच १ डिसेंबरपासून २०२३ या वर्षातील शेवटचा महिना सुरु झाला आहे. मात्र हा महिना सुरु होताच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder Hike) आजपासून महाग झाला आहे. यामुळे महागाईने (inflation) होरपळलेल्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

नक्की वाचा : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक रिक्षा योजना’

महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत ४१ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ १९ किग्रॅ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Price) दरांत करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६.५० रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२८ रुपयांवरुन १७४९ रुपये झाली आहे.

हेही वाचा : ‘डान्स प्लस’ चा सातवा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

वाढलेल्या एलपीजी सिलेंडरच्या किमती IOCL या वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत १०३ रुपयांनी वाढ केली होती. १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत त्याची किंमत १८३३ रुपये झाली होती. मात्र १६ नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्ताने एलपीजी सिलेंडवर दिलासा देण्यात आला होता. सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी कमी करत १७५५.५० रुपये झाली होती. मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा एकदा ४१ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळेसिलेंडर दराची अवस्था होती तीच झाली आहे.

महत्वाची बाब म्हणजे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत असला तरी तेल कंपन्यांनी १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here