M. R. Sharma : एम. आर. शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

M. R. Sharma : एम. आर. शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

0
M. R. Sharma

M. R. Sharma : नगर : एम. आर. शर्मा (M. R. Sharma) यांची कृषक भारती कॉ-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (Krishak Bharati Co-operative Limited) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) या व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

अवश्य वाचा: लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका; गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

१ सप्टेंबरपासून त्यांनी स्वीकारला पदभार

शर्मा यांना अमोनिया आणि युरिया उत्पादनाच्या एकात्मिक संयंत्रासह संबंधित उपयुक्तता संयंत्रांमध्ये ४२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कृभकोमध्ये १९८२ मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून रूजू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावर पोहोचणारे ते पहिले पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अमोनिया आणि युरिया कॉम्प्लेक्सच्या सुधारणेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

नक्की वाचा: ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित

उत्कृष्ट सीईओ म्हणून सन्मानित (M. R. Sharma)

कोरोना काळात कच्च माल आणि कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे पश्‍चिम भारतातील बहुतेक खत संयंत्रे बंद करावी लागली. तेव्हा एम. आर. शर्मा यांनी विक्रमी ऊर्जा कार्यक्षमतेसह उत्पादन सुविधा १०० टक्क्यांहून अधिक क्षमतेने चालू ठेवण्यात यश मिळवले. याबद्दल त्यांना सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीतर्फे उत्कृष्ट सीईओ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रतिष्ठित द सीईओ मॅगझिनमध्ये त्यांची निवड करण्यात आली.