Madhi : मढी यात्रेत लाखो भक्तांची मांदियाळी

Madhi : मढी यात्रेत लाखो भक्तांची मांदियाळी

0
Madhi : मढी यात्रेत लाखो भक्तांची मांदियाळी
Madhi : मढी यात्रेत लाखो भक्तांची मांदियाळी

Madhi : पाथर्डी : तालुक्यातील मढी (Madhi) येथील चैतन्य कानिफनाथाच्या (Chaitanya Kanifnath) यात्रेला होळीपासून सुरुवात झाली आहे. रंगपंचमीच्या (Rang Panchami) दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. अठरापगड जातीचे भाविक संपूर्ण महाराष्ट्रासह (Maharashtra) राज्यातून दर्शनासाठी गर्दी करत असतात. शेकडो देवकाठ्या मिरवणुकीने येऊन मंदिराच्या कळसाला लागल्यानंतर त्यांची यात्रा पूर्ण होते अशी या ठिकाणची परंपरा आहे. यासाठी विविध धार्मिक विधी गावोगावच्या भाविकांकडून केले जातात.

नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड

२५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

संपूर्ण यात्रा परिसर व्यावसायिकांनी लावलेल्या दुकानांनी आलेल्या भाविकांनी गर्दीने फुलून गेला आहे. यात्रा उत्सव शांततेत सुरू असून जवळपास २५ लाख भाविकांनी या ठिकाणी मंदिराला दर्शनासाठी भेट दिली असल्याची माहिती मढी देवस्थानचे विश्वस्त बबन मरकड यांनी दिली.

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून

परराज्यातून गाढवांच्या व्यापाऱ्यांची हजेरी (Madhi)

मढी यात्रेत गाढवांचा बाजार हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असून राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरत असतो. मढी येथे राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी गाढवांचे व्यापारी येत असतात. पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे.गुजरातच्या काठेवाड येथील गाढवांना या बाजारात मोठी मागणी असते. दहा हजारांपासून पन्नास हजार पर्यंत गाढवांची किंमत या बाजारात असते. पांढरे शुभ्र, उंचीला आणि जास्त ओझे वाहण्यासाठी चांगले असल्याने त्याची किंमत जास्त असते. रंग, वय, दातांची संख्या, उंची यावरून गावरान गाढवाची किंमत ठरते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.