Madhi : दोन टन गोवऱ्या अन् २० फूट उंची; मढीच्या कानिफनाथ गडावर मानाच्या होळीला उत्साहात प्रारंभ

0
Madhi : दोन टन गोवऱ्या अन् २० फूट उंची; मढीच्या कानिफनाथ गडावर मानाच्या होळीला उत्साहात प्रारंभ
Madhi : दोन टन गोवऱ्या अन् २० फूट उंची; मढीच्या कानिफनाथ गडावर मानाच्या होळीला उत्साहात प्रारंभ

Madhi : पाथर्डी :
श्री क्षेत्र मढी (Madhi) येथे बुधवारी (ता. १८) होळीचा (भट्टी) पारंपरिक सण उत्साहात साजरा झाला. संपूर्ण गावाची मिळून एक होळी (Holi) कानिफनाथ मंदिरासमोर शेजारतीनंतर विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली. होळीचा पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला आहे. हुताशनी पौर्णिमेच्या अगोदर १५ दिवस होळी साजरी करणारे मढी हे देशातील एकमेव गाव आहे. या होळीला सुमारे ५०० वर्षांचा इतिहास (History) आहे. मढीचे ग्रामस्थ पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी करीत नाही.

हे वाचा : आश्रमशाळेतून थेट ‘इस्रो’ची वारी

होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य

बुधवारी (ता. १८) रोजी नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे पदाधिकारी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजता होळी पेटली. गावातून गोवऱ्या वाजत गाजत गडावर आणण्यात आल्या. सुर्यास्तापुर्वी भट्टी रचून रात्री पेटविली गेली. मढीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ तर गडावर भाविकांची गर्दी होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवण्यात आला होता. भट्टी पेटल्यानंतर प्रदक्षिणा घालत नारळ अर्पण करण्यात आले.

नक्की पहा : मढी येथील कानिफनाथ गडावर पेटली पहिली मानाची होळी

दोन टन गोवऱ्या (Madhi)

श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानीफनांथांची संजीवन समाधी असून होळीपासून सुरू झालेली यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. गावातून सुमारे दोन टन गोवऱ्या येथे जमतात. १५ फूट व्यासाचे वर्तुळ व सुमारे दहा फूट उंचीची रचलेली होळी म्हणजे नाथ सांप्रदायाची भव्य धूनी म्हणूनही नाथ भक्त बघतात. या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्याच फक्त वापरल्या जातात. लाकडाचा कुठेही वापर होत नाही.