Madhi : पारनेर : शिव पाणंद शेत रस्ते (Shiv Panand Farm Roads) चळवळीने राज्यातील रस्ते ग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी शासन पातळीवर अतिशय योग्य असे शासन आदेश काढण्यात अभूतपूर्व पूर्व यश मिळविले आहे. त्याबाबत योग्य ती जागृती करणे व त्यात येणाऱ्या विविध समस्या यावर राज्यस्तरीय अधिवेशन श्री क्षेत्र चैतन्य कानिफनाथ देवस्थान मढी (Madhi), पाथर्डी, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
नक्की वाचा : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक
शासकीय विश्रामगृहात बैठक
यावेळी देवस्थान ट्रस्टने महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना शेतरस्त्यांच्या प्रश्नावर होण्याऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टींचे आभार मानले त्यानंतर शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे संस्थापक शरदराव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यात ५ एप्रिलला १० ते ५ वाजेपर्यंत मढी येथील कानिफनाथ मंदिर येथे चळवळीचे राज्यस्तरीय अधिवेशन व्यापक प्रमाणात घेण्याचे ठरले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विचारविनिमय करून निर्णय घेतले जाणार (Madhi)
अधिवेशनात प्रशासकीय पातळीवरील महसूल, भूमी अभिलेख, पोलीस तसेच कायदेशीर सल्लागार यांचे चर्चासत्र, चळवळ चालवताना येणाऱ्या विविध समस्या यावर मार्गदर्शन होणार आहे. ज्या तालुक्यात उल्लेखनीय कार्य केले आहे तेथील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान आणि ज्या तालुक्यात काम करण्यास समस्या येतात तेथील समस्यांचे अवलोकन करून संबंधीत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत योग्य उपाययोजना करण्यासाठी तज्ञांशी विचारविनिमय करून निर्णय घेतले जाणार आहेत.राज्यभरातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यातील कार्यरत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या काही वैशिष्ट्यपूर्ण व नियमबाह्य, बेकायदेशीर प्रकरणे चळवळीच्या राज्य कार्यकर्त्यांकडे मुद्देसूद पाठवावीत. तसेच राज्यातील चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी ऑनलाइन बैठक, प्रशिक्षण वर्ग , सेवानिवृत्त तज्ञांचे मार्गदर्शन आदींचे नियोजन रूपरेषा करण्याचे ठरले.
विविध समस्यांबाबत निवेदन
याप्रसंगी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अतिक्रमित, बंद, अडवलेले शिव – पाणंद व वहिवाटीचे आणि नकाशावरील रस्ते खुले करताना येणाऱ्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. उपजिल्हाकारी गणेशजी मरकड, देवस्थान ट्रस्टचे तिठ्ठल मरकड, मदन मरकड, उषाताई मरकड, दादासो मरकड, उत्तम मरकड, महादेव कोकाटे, मुरसिंग पवार, अनिल साठे, तान्हाजी ढसाळ, अशोकराव पवार, संजय मरकड आदिंच्या उपस्थित कार्यक्रमाच्या नियोजनाजी तयारी करण्यात आली राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांसाठी व पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी हे अधिवेशन प्रेरणादायी राहिल असे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित
यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे , पोपटराव शेळके, अशोक कचरे, मनोहर मतकर , कानिफनाथ कदम, कारभारी गरड बाबासाहेब थोरात , प्रशांत चौधरी, ह रिभाऊ पवार, विठ्ठल निर्मळ, मुक्ताजी चंद , आशाबाई वाघ , उषाबाई हुके , भाऊसाहेब तेलोरे , बाजीराव जगदाळे , विलास जगदाळे , सचिन तलोरे, पोपट जाधव, संजय मोहीते, अमोल टेमकर आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते



