Madhi Yatra : पाथर्डी : कैकाडी समाजाची (Kaikadi society) मानाची काठी मढी येथील कानिफनाथांच्या (Kanifnath) कळसाला भेटल्यानंतर हुताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळीच्या दिवसापासून मढी यात्रेला (Madhi Yatra) सुरुवात झाली आहे.
अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
संपूर्ण देशात प्रसिद्ध (Madhi Yatra)
भटक्याची पंढरी म्हणून कानिफनाथांची यात्रा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशातून लाखो भाविक कानिफनाथाच्या यात्रेला येतात. मढी देवस्थानकडून विविध जाती धर्मांना येथे मानपान दिला गेला आहे. कानिफनाथांच्या मढी गडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजाने पाट्या विणून गाढवाद्वारे येथील सामग्री आणण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटविण्यात येते. ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होऊन गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे.
हेही पहा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील
पारंपरिक वाद्यांच्या गजर (Madhi Yatra)
चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, जयघोष तर डफ, ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात कैकाडी समाजबांधव याप्रसंगी तल्लीन झाले होते. शनिवारी रात्री मानाचे काठीची पाथर्डीतील शंकरनगर येथून मिरवणूक सुरू झाली. रात्रभर प्रवास करून सकाळी मिरवणुकीने समाज बांधव मढी येथे आले. संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा घालून” कानिफनाथ गडापर्यंतची मिरवणूक रंगतदार ठरली. रविवारी सकाळी काठी उत्सव सांगता झाली. देवस्थान विश्वस्त मंडळाने मुख्य मानकरी नारायण बाबा जाधव यांना सन्मानित केले.
मानाची काठी संजीवन समाधीसह कळसाला भेटविली की यात्रेचा डफ वाजतो. त्यानंतर पंधरा दिवस चालणाऱ्या महायात्रेस आरंभ होतो. महाराणी येसूबाई यांच्या नवसपूर्तीसाठी सातारा गादीचे वंशज छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांनी कानिफनाथ गडाचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. गड बांधकामासाठी योगदान असणाऱ्या विविध जाती- जमातींना येथील यात्रेत विशेष मान आहेत. त्यामुळे हे गाव सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला लागली की इतर समाजबांधवांच्या काठ्यांची मढी वारी सुरू होते.