Madhi Yatra : मढी यात्रेत व्यापाऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Madhi Yatra : मढी यात्रेत व्यापाऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

0
Madhi Yatra : मढी यात्रेत व्यापाऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Madhi Yatra : मढी यात्रेत व्यापाऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Madhi Yatra : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेत ग्रामपंचायत (Gram Panchayat) कराच्या नावाखाली बाहेरगावाहून आलेल्या व्यापाऱ्यांची लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. मढी यात्रेत (Madhi Yatra) अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते (Prasad Mate) यांच्याकडे निवेदन देत आम्हाला यात्रेत व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

नक्की वाचा : धांदरफळ खुर्द येथे महसूलचे महाराजस्व अभियान शिबिर

दुकाने लावण्यास मज्जाव

या संदर्भात संदीप काकडे, सोमनाथ टेके, अनिल लाटे, गणेश टेके, सुरेश काकडे, नागेश काकडे, जितेंद्र भापकर, लक्ष्मण कदम, शरद काळे, दत्ता दिनकर आदी व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मढी येथे कानिफनाथांची यात्रा सुरू झाली आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या यात्रेत दुकाने लावून व्यवसाय करत आहोत. मात्र यंदा गावातील वाढलेले अतिक्रमण तसेच काही स्थानिकांनी मनमानी पद्धतीने जागेवर हक्क सांगत आम्हाला दुकाने लावण्यास मज्जाव केला आहे. तसेच, ही जागा आमची असून तुम्हाला येथे दुकाने लावता येणार नाहीत. दुकाने लावायची असल्यास ठराविक रक्कम भाडे म्हणून द्यावी लागेल अशी भूमिका काही जणांनी घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे यात्रेत व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या व्यापाऱ्यांची लूटमार होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी (Madhi Yatra)

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन ते तीन पिढ्यांपासून काही व्यावसायिक मढी यात्रेत नियमितपणे दुकाने लावून आपला व्यवसाय करत आहेत. यापूर्वी कधीही अशा प्रकारचा त्रास झाला नव्हता. मात्र यंदा अचानक अडथळे निर्माण होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाची चौकशी करून यात्रेत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली आहे.दरम्यान, या निवेदनावर मनसेचे अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ तसेच नगरसेवक देवा पवार आणि संजय भागवत यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.