Madhi Yatra : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

Madhi Yatra : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

0
Madhi Yatra : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन
Madhi Yatra : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

Madhi Yatra : पाथर्डी : रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी (Madhi Yatra) येथे नाथभक्तांचा जनसागर उसळला. ‘अलख निरंजन’च्या घोषात, तसेच शंख, ताशा व डफाच्या गजरात लाखो भाविकांनी चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या (Chaitanya Kanifnath Maharaj) संजीवन समाधीचे दर्शन घेतले. राज्यासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी दाखल झाले होते. रंगपंचमी (Rangpanchami) हा नाथांचा समाधी दिन मानला जात असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद

साधू-संतांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

अठरापगड जातींसह नाथसंप्रदायातील साधू-संतांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. मंदिर परिसरासह सुमारे चारशे एकर परिसर यात्रामय झाला होता. मंदिराच्या कळसाला हजारो देवकाठ्या अर्पण करण्यात आल्या. मढीची प्रसिद्ध गोडीशेव व रेवडीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यात्रेदरम्यान वाहतूक कोंडीसह काही किरकोळ चोरीच्या घटनाही घडल्या.तिसगावकडून मढीकडे येणाऱ्या वेस परिसरात तसेच मढीतील श्रीराम चौक, निवडुंगा मढी, मढी–धामणगाव पाथर्डी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी तीननंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. दर्शन बारीत भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या बाटल्या मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

पन्नास एकर जागेवर वाहनतळाची व्यवस्था (Madhi Yatra)

गडावरील पैठण दरवाजातून मोठ्या प्रमाणात देवकाठ्या नेण्यात आल्या. मंदिराचे पूर्व व पश्चिम दरवाजे भाविकांना ये-जा करण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. मंदिर परिसरातील सुमारे चारशे एकर क्षेत्रात वाहने, नाथभक्त, दुकाने व विविध धार्मिक कार्यक्रम यांमुळे सर्व परिसर यात्रामय झाला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच मराठी चित्रपट अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांनीही कानिफनाथांचे दर्शन घेतले. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. फटाक्यांची आतषबाजी व विद्युत रोषणाई मुळे गड परिसर लखलखीत झाला होता. यंदा धामणगाव–पाथर्डी रोडवर सुमारे पन्नास एकर जागेवर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा चारचाकी वाहने व एसटी बससाठी मोठा उपयोग झाला.

मधमाशांचा काही भाविकांवर हल्ला

तीव्र उन्हातही नाथभक्त लहान मुलांना घेऊन कानिफनाथांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येत होते. दरम्यान, मढीतील तिसगाव रोडवर सरकार हॉटेलसमोर आग्या मोहोळ उठल्याने मधमाशांनी काही भाविकांवर हल्ला केला. या घटनेत दहा ते पंधरा भाविक जखमी झाले असून त्यात महिला भाविकांचाही समावेश आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही भाविकांनी गाड्या सोडून पळ काढला.चोवीस तास कानिफनाथ समाधी मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. अन्नछत्रालयापासून दर्शनबारीसाठी रांग सुरू करण्यात आली होती. विविध हॉलमधून मार्गक्रमण करत भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. यंदा व्हीआयपी दर्शन व्यवस्थेमुळे देवस्थानाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची दुकाने

यात्रेत रेवडी, गोडीशेव, फरसाण, फुटाणे, नाडा, अत्तर, हळद-कुंकू, पेढे, नारळ, खडीसाखर तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. नाथसंप्रदायातील शंख, माळा, मोरपिसे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचीही विक्री होत होती. नाथांचा प्रसिद्ध प्रसाद असलेली रेवडी तसेच गूळ व चपाती किंवा भाकरीचा चुरमा करून तयार केलेला ‘मलिदा’ हा प्रसाद मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आला. दिवसभर ढोल, ताशा व डफाच्या गजरात “कानिफनाथ महाराज की जय”चा जयघोष मढी परिसरात दुमदुमत होता. मात्र यात्रेच्या गर्दीमुळे अनेक नाथभक्त तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडले.

देवस्थान कर्मचाऱ्यांचे यात्रा नियोजनासाठी विशेष परिश्रम

देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, माधुरी मरकड, अनिल साठे, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तम मरकड, तानाजी ढसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड यांच्यासह देवस्थान कर्मचाऱ्यांनी यात्रा नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.