Madhusudan Kalekar: मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वर्गीय मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे मोठा सोहळा पार पडला.

0
Madhusudan Kalekar
Madhusudan Kalekar

नगर : लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या स्वर्गीय मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी (Birth Centenary) वर्षाचे औचित्य साधून १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर (Shri Shivaji Mandir) येथे मोठा सोहळा पार पडला. मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांनी  पुढाकार घेतला. 

नक्की वाचा : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा पराभव;शुभमन गिलची विजयी सुरवात

सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Madhusudan Kalekar)

स्वर्गीय मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली. या जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात, ‘डार्लिंग डार्लिंग, ‘नाथ हा माझा’ या प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण झाले. 

अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले

कालेलकर यांच्या कलाकृतींना प्रेमळ पोचपावती (Madhusudan Kalekar)

हाऊसफुल्ल गर्दीत प्रेक्षकांनी कालेलकर यांच्या कलाकृतींना आपली प्रेमळ पोचपावती दिली. या सोहळ्याच्या उद्घाटनाला ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते पद्मभूषण राजदत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी  मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना,”मला चांगलं काम करण्याची प्रेरणा देणारा तसेच माझ्या अभिनय कारकिर्दीला दिशा देण्याचे मोलाचे सहकार्य करणारा उत्तम माणूस” अशा शब्दात श्री.राजदत्त यांनी मधुसूदन कालेलकर यांना मानवंदना दिली.  

मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मदिनी म्हणजे २२ मार्च रोजी ‘सूर तेची छेडीता’ या सांगीतिक कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप झाला. एक काळ गाजवलेली आणि आजही प्रत्येक वयोगटातील कानसेन आणि गानसेनांना भावणारी गाणी प्रेक्षकांच्या देखील ओठी रुळली, हे पाहताना मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे डोळे पाणावले.

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी, ‘अशा महोत्सवांमधून जुनं ते सोनं या उक्तीची अक्षरशः जाणीव होते. शिवाय तो काळ,तेव्हाची गाणी, चित्रपट यांमुळे एक वेगळाच आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो असं सांगत, महोत्सवासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here