Mahadevi Elephant : तर आम्ही महादेवी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट

Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट

0
Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट
Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट

Mahadevi Elephant : नगर : नांदणी मठाची महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या (Vantara) सीईओंनी स्पष्ट केलं. तसेच नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी म्हटलं आहे.

महादेवी हत्तीण मठातील धार्मिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग

महादेवी हत्तीण मागील ३३ वर्षांपासून नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग होती. प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या संस्था, विशेषत: PETA, यांच्या तक्रारीमुळे पर्यावरण व वनविभाग आणि नंतर मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने हत्तीणीच्या स्थलांतराचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशाचा सन्मान राखत अखेर मठाधिपती आणि ग्रामस्थ भावपूर्ण निरोप देत हत्तीणीला वनताराकडे रवाना करण्यात आले. महादेवीच्या निरोपावेळी गावात भावूक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू होते. मात्र, या निर्णयामुळे अवघ्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.

Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट
Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट

नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष

कोर्टाच्या सूचना आल्या तर हत्तीण परत करू (Mahadevi Elephant)

नांदणी मठाने यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं. हवं असेल तर नांदणीच्या मठामध्ये वनताराचे एक युनिट सुरू करू. आम्हाला जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमची यामध्ये भूमिका शून्य आहे. लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे, पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं प्रकाश आबिटकरांनी माहिती दिली.

Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट
Mahadevi Elephant : तर आम्ही माधुरी हत्तीणीला नांदणी मठाला परत करू; वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट

अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, (Mahadevi Elephant)

“कोल्हापूरवासियांची भावना सर्वोच्च न्यायालयात मांडू. एखादा निर्णय ज्या वेळी सर्वोच्च न्यायालय घेते त्यावेळी फक्त जनभावना महत्त्वाची नाही. त्या जनभावनेइतकीच कायदेशीर प्रक्रियाही महत्त्वाची आहे. त्यामुळे एका बाजूला आपण कायदेशीर लढाई लढू. यासाठी वनताराचे सहकार्य राहील.”