Mahadevi Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील महादेवी हत्तीणीची (Mahadevi Elephant) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिलेल्या आदेशानंतर वनतारामध्ये (Vantara) रवानगी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विरोधानंतर आता राज्य सरकारने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी चर्चा केली.यावेळी वनतारानेही सकारात्मक भूमिका घेत राज्य सरकारला न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्यास तयारी दर्शवली आहे. वनताराशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
नक्की वाचा :वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूच नाव ‘वॉशिंग्टन’ कस पडलं ? नावामागचा किस्सा काय ?
राज्य सरकारच्या याचिकेत वनताराही सहभागी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, महादेवी हत्तीण म्हणेजच माधुरी पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की,आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणी साठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अवश्य वाचा : अमृता खानविलकरला मिळाला पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार!
नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी
नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी,अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासन सुद्धा स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल,असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.