Maha Kumbh 2025 : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj) येथे उद्या माघी पौर्णिमेनिमित्त (Maghi Purnima Snan) मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सहा पवित्र दिवसांपैकी एक असलेल्या महाकुंभातील (Mahakumbh) पाचव्या स्नानासाठी कोट्यावधी भाविक प्रयागराज येथे जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी येथे वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येदिवशी ३० भाविकांचा चेंगराचेंगरीदरम्यान या ठिकाणी मृत्यू झाला होता.अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतली आहे.
नक्की वाचा : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर
परिसरात नो व्हेईकल झोन घोषित (Maha Kumbh 2025)

माघी पौर्णिमेला (ता.१२) गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने आज मंगळवारी पहाटे ४ वाजल्यापासून परिसरात नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर,वेगवेगळ्या मार्गांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. तिथे शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने पार्क करावी लागतील. उद्या संपूर्ण दिवस हीच वाहतूक व्यवस्था लागू राहील. तर, अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. संगमाजवळ ठराविक काळासाठी राहणाऱ्या कल्पवासींच्या वाहनांनाही हे निर्बंध लागू असतील.
अवश्य वाचा : फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता रूपेरी पडद्यावर;छबी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

सोमवारी (ता.१०) रात्री पोलिस आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. योगी आदित्यनाथ यांनी सुव्यवस्थित वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन योजनेचे आवाहन केले. त्यांनी अधिकाऱ्यांना ५ लाखांहून अधिक वाहनांच्या उपलब्ध पार्किंग क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्याचे निर्देश दिले.“रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागू देऊ नयेत. वाहतूक कोंडी कोणत्याही परिस्थितीत रोखली पाहिजे”,असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
८ ते १० किमी पायी प्रवास करावा लागणार (Maha Kumbh 2025)
आता तुम्ही जर प्रयागराजला जात आहात तर तुम्हाला कदाचित ८ ते १० किमी चालत प्रवास करावा लागेल. बॉर्डरपासूनच तुम्हाला शटल बस किवा ऑटोने प्रयागराजमध्ये प्रवेश करावा लागेल. तिथून महाकुंभात पोहोचायला ८ ते १० किमी पायी चालावं लागणार आहे.