Mahakali Movie : दिग्दर्शक प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांच्या ‘हनुमान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.आता ‘प्रशांत वर्मा सिनेमॅटिक यूनिवर्स’ची नवीन फिल्म ‘महाकाली’चं (Mahakali Movie) पहिलं पोस्टर रिलीज (Poster Release) करण्यात आलं आहे. ज्यामध्ये भूमि शेट्टीचा (Bhumi Shetti) थरारक लूक दाखवण्यात आला आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट माता कालीच्या कथेवर आधारित असेल. या चित्रपटाची कथा प्रशांत वर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील ‘असूरगुरू शुक्राचार्य’ म्हणून अक्षय खन्नाचा लूकही समोर आला आहे.
नक्की वाचा: लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘महाकाली’ सिनेमाची ५० टक्क्यांहून अधिक शुटिंग पूर्ण झाली आहे. सध्या हैदराबादमध्ये उभारण्यात आलेल्या, भव्य सेटवर शुटिंग सुरू आहे. प्रशांत वर्मा यांच्या  फ्रँचायझीचा पहिला चित्रपट ‘हनुमान’ मध्ये तेजा सज्जा सारख्या सुपरस्टारला कास्ट करण्यात आलं होत.आता भूमी शेट्टी ही ‘महाकाली’मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
माहितीनुसार, फिल्ममध्ये भूमी शेट्टीची कास्टिंग करण्यात आली. कारण, मेकर्सना अशी अभिनेत्री हवी होती, जी कहाणीचा आत्मा पडद्यावर साकारू शकेल. यामध्ये ‘महाकाली’च्या फर्स्ट लूकमध्ये भूमीचा चेहरा दिव्यता आणि गूढतेचा एक अनोखा मिलाफ दाखवतो, यात शंका नाही. लाल आणि सोनेरी रंगाचा पोषाख, पारंपारिक दागिने आणि पवित्र चिह्नांनी सजवलेल्या ‘महाकाली’चं विक्राळ रूप, डोळ्यांत क्रोध आणि करुणा यामुळे भूमी शेट्टी अपेक्षा आणखी वाढवते.
अवश्य वाचा: बच्चू कडू यांचा एल्गार नेमका कशासाठी ? प्रमुख मागण्या कोणत्या ?
भूमी शेट्टी कोण आहे ? (Mahakali Movie)
अभिनेत्री भूमी शेट्टीचं खरं नाव भूमिका शेट्टी आहे. ती यापूर्वी कन्नड टीव्ही मालिका ‘किन्नरी’ आणि तेलुगू मालिका ‘निन्ने पेल्लादथा’मध्ये दिसली होती. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस कन्नड’मध्ये देखील ती स्पर्धक होती. भूमी शेट्टीनं २०११ मध्ये ‘इक्कत’ या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ती कर्नाटकातील करावली प्रदेशातील कुंडापुराची रहिवाशी आहे. ‘हैदराबाद टाईम्स’नं भूमी शेट्टीला २०१८ ची ‘मोस्ट डिजायरेबल वुमन ऑफ स्मॉल स्क्रीन’ म्हणून निवडल होते.
प्रशांत वर्मा नेमकं काय म्हणाले ? (Mahakali Movie)
‘महाकाली’बद्दल बोलताना प्रशांत वर्मा म्हणाले की, ‘हनुमान’ नंतर, मी दिव्य स्त्रीत्वाचं सार खोलवर समजून घेण्यास आणि ते पडद्यावर जिवंत करण्यास आकर्षित झालो आणि ‘महाकाली’ पेक्षा अधिक योग्य काय असू शकतं. ती आपल्या इतिहासात आणि पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली एक वैश्विक शक्ती आहे. आपल्या चित्रपट उद्योगात, तिला खरोखर पात्र असलेल्या भव्यतेनं क्वचितच चित्रित केलं गेलं आहे.” ते म्हणाले की, भूमी शेट्टीला मुख्य भूमिकेत कास्ट केल्याबद्दल मला अभिमान आहे.



