Mahakumbh : नेवासेकरांनी अनुभवला महाकुंभ पर्वाचा क्षण    

Mahakumbh : नेवासेकरांनी अनुभवला महाकुंभ पर्वाचा क्षण    

0
Mahakumbh : नेवासेकरांनी अनुभवला महाकुंभ पर्वाचा क्षण    
Mahakumbh : नेवासेकरांनी अनुभवला महाकुंभ पर्वाचा क्षण    

Mahakumbh : नेवासा: नेवासा (Newasa) शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी (ता.१३) सायंकाळी ७ ते ८ यावेळेत झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या (Pravaramai) महाआरती सोहळ्याला संत महंतांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती. महाकुंभच्या (Mahakumbh) पर्वकाळात झालेल्या महाआरतीने हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवला. “गंगा गोदावरी माता की जय” “अमृतवाहिनी प्रवरामाता की जय” च्या गजराने येथील परिसर दुमदूमला होता. तर यावेळी झालेल्या दिपोत्सवाने प्रवरामाई उजळून निघाली होती.

अवश्य वाचा : परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

महाआरतीचा सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा

नेवासे येथील गणपती घाटावर श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रवरामाईचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. तसेच आकर्षक भव्य विद्युत रोषणाई सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी झालेला अमृतवाहिनी प्रवरामाईचा महाआरतीचा सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

नक्की वाचा : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका

वेदमूर्ती पुरोहितांची गंगापूजन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती (Mahakumbh)

यावेळी झालेल्या महाआरती सोहळयाच्या प्रसंगी सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर, श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज, नेवासा येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे प्रमुख महंत ज्ञानेश्वरजी महाराज, पिचडगाव येथील माऊली आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे, संत सेना महाराज मंदिराचे मार्गदर्शक गायनाचार्य सचिन महाराज पवार, घोगरगाव येथील बालब्रम्हचारी विश्वनाथजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित संत महंतांचे संतपूजन श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत झालेला महाआरतीचा सोहळयाच्या प्रसंगी नाशिक येथील गंगा-गोदावरी पंचकोटी आरती समूहातील आचार्य वेदमूर्ती अतुल गायधनी, शेखर शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, कल्पेश दीक्षित, अतुल पंचभय्ये, सदानंद देव, सौरभ गायधनी, अलोक गायधनी, सिद्धेश खांदवे, अमित पंचभाई, मोहक गायधनी, कल्पेश दीक्षित, नितीन पाराशरे या वेदमूर्ती पुरोहितांची गंगापूजन व आरती सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.  

 
स्थानिक ग्रामपुरोहित वेदशास्त्रसंपन्न पांडूगुरू जोशी, निखिलगुरू जोशी,अभिजित बडवे, मयूर जोशी,लक्ष्मीकांत जोशी या मंडळींनी झालेल्या महाआरती सोहळयाचे पौरोहित्य केले.महाराष्ट्राचा शेतकरी हा सधन झाला पाहिजे,आपला देश समृद्ध झाला पाहिजे म्हणून प्रवरामाईचे पूजन आपण करत असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. संकल्प प्रसंगी हजारो भाविकांनी हात जोडून पूजन केले.          
यावेळी सर्व संत मंडळींच्या वतीने बोलतांना सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत उध्दव महाराज मंडलिक म्हणाले, अमृतेश्वर पायथ्यापासून प्रवरानदीचा उगम झाला. तेथून ते नेवासेपर्यंत अनेक तीर्थक्षेत्रे प्रवरामाईच्या तीरावर येथे वसलेली आहे. म्हणून नेवासे ही पवित्र अशी पुण्यपावन भूमी आहे. येथे भगवान विष्णूंनी मोहिनीमायचा अवतार घेऊन अमृताचे वाटप केले असल्याचे सांगून त्यांनी प्रवरामाईचे महात्म्य शुभाशीर्वादपर भाषणात बोलतांना विषद केले. महाआरती प्रसंगी “धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणीयोमे समभावना हो, विश्व का कल्याण हो”,”हर हर महादेव,”गंगा गोदावरी माता की जय”,”अमृतवाहिनी प्रवरा माता की जय”असा जयघोष यावेळी करण्यात आला. महाआरती सोहळयाला विविध संस्था व संघटनेचे पदाधिकारी यात्रा कमिटीचे सदस्य महिला, पुरुष, युवक, युवती, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.