नगर : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याची (Mahakumbh 2025) नुकतीच सांगता झाली. मात्र महाकुंभ मेळ्याच्या आयोजनातील त्रुटी,चेंगराचेंगरी, आग लागण्याच्या घटना, भाविकांचा मनस्ताप असे मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून टीका केली जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi Adityanath) यांनी महाकुंभात बोट व्यावसायिकाने कमावलेली पैशाची आकडेवारी (Boat Owner Earnings) सादर केली आहे. ही आकडेवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
नक्की वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्मारक ‘या’ ठिकाणी उभारलं जाणार
४५ दिवसांमध्ये तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई (Mahakumbh Boat Owner Earnings)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात एका चर्चेदम्यान महाकुंभमेळ्यातील आर्थिक व्यवहारांबाबतची एक आकडेवारी सादर केली आहे. यासंदर्भात माहिती देताना योगी आदित्यनाथ यांनी माहरा नावाच्या एका कुटुंबाची कथा सांगितली. त्यानुसार महाकुंभमेळ्याच्या अवघ्या ४५ दिवसांमध्ये या कुटुंबानं तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.
अवश्य वाचा : २८० टाके,अर्धा लिटर रक्त डोक्यातून वाहिलं!छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर कटरने सपासप वार

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांमध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला.यादरम्यान,नद्यांवर फेरी बोटीची सेवा पुरवणाऱ्या माहरा कुटुंबाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी उदाहरणादाखल उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिली. या मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज मधील नावाड्यांचं आर्थिक शोषण झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्यावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देताना ही माहिती दिली.
योगी आदित्यनाथ यांनी काय सांगितले ?(Mahakumbh Boat Owner Earnings)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, माहरा कुटुंबाच्या मालकीच्या जवळपास १३० बोटी आहेत. या प्रत्येक बोटीने दिवसाला सरासरी ५० ते ५२ हजारांची कमाई केली. महाकुंभमेळा संपेपर्यंत प्रत्येक बोटीच्या कमाईचा आकडा जवळपास दोन ते अडीच कोटी होता. त्यामुळे माहरा कुटुंबाकडील सर्व बोटींची महाकुंभमेळ्यातील एकूण कमाई जवळपास ३० कोटींच्या घरात गेली,अशी माहिती योगींनी विधानसभेत दिली. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.