नगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने देशभर या आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आहे. याच दिनाचे औचित्य साधत ‘महापरिनिर्वाण’ (Mahaparinirvaan) चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रसाद ओक (Prasad Oak) श्री नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारत आहे.
नक्की वाचा : अनिल कपूरचा ‘फायटर’ सिनेमातील लूक आऊट
‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे. “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय.” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा केला आहे.
अवश्य वाचा : सत्यजित तांबेंचा ‘पुस्तक तुला’ करून सन्मान
प्रसाद ओकसह अभिनेता गौरव मोरेही या चित्रपटामध्ये दिसत आहे. मात्र या चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी काय आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार ? हे सुद्धा समोर आलेलं नाही. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शैलेंद्र बागडे यांनी सांभाळली आहे.