Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन; हजाराे अनुयायांचे महामानवाला अभिवादन

Mahaparinirvan Diwas : नगर : भारतीय राज्यघटनेचे (Constitution of India) शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) नगर शहरासह जिल्ह्यात हजाराे अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

0
Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन; हजाराे अनुयायांचे महामानवाला अभिवादन
Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन; हजाराे अनुयायांचे महामानवाला अभिवादन

Mahaparinirvan Diwas : नगर : भारतीय राज्यघटनेचे (Constitution of India) शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) नगर शहरासह जिल्ह्यात हजाराे अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. शहरातील मार्केटयार्ड चाैकातील पुतळ्यास तथागत बुद्धिस्ट साेसायटीच्या बाल भिक्षू संघाच्या सदस्यांनी भीमवंदनेने बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन; हजाराे अनुयायांचे महामानवाला अभिवादन
Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन; हजाराे अनुयायांचे महामानवाला अभिवादन

हे देखील वाचा : आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील

महापुरुषांची प्रतीकपूजा ओलांडणारा विज्ञानवादी समाज उभा राहावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. सध्या सर्वच समाज आपापल्या महापुरुषांना जातिबद्ध करण्याच्या स्पर्धेत अडकले आहेत. खरे तर राजकीय फायद्यासाठी जातिबद्ध झालेला समाज केवळ तणाव पसरवू शकतो; तो सामाजिक फेररचना करू शकत नाही. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आज ६७ वर्षे होत आहेत.

नक्की वाचा : उद्यापासून ट्रिपल इंजिन सरकारशी विराेधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद, बहुजन समाज पार्टी, तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी अमित काळे, विजय भांबळ, दया गजभिये, गौतम कांबळे, शनेश्र्वर पवार, निखिल साळवे, विजितकुमार ठोंबे, बाळासाहेब कांबळे, सुनील पंडित, संजय भिंगारदिवे, जीवन कांबळे, बबन दिवे, नवीन भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, दत्ता नेमाणे, सागर चाबुकस्वार, बाळासाहेब धीवर, एन.एम. पवळे, वसंतराव थोरात, के. के. जाधव, नंदा भिंगारदिवे, श्‍याम थोरात, श्‍याम गोडळकर, निखील पठारे आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here