Mahaparinirvan Movie:६ डिसेंबरला’महापरिनिर्वाण’होणार प्रदर्शित

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली आहे. 

0
Mahaparinirvan Movie
Mahaparinirvan Movie

नगर : शोषित आणि वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनीच हंबरठा फोडला होता. आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने तर मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता. या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार नामदेवराव व्हटकर (Namdevrao Vhatkar) होते.  

नक्की वाचा : ठरलं तर मग!आढळराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नामदेवराव व्हटकर यांच्या भूमिकेत प्रसाद ओक (Mahaparinirvan Movie)

आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची या चित्रपटातील भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली आहे. तर अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकार ही या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी गुपित आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आणि अमर कांबळे यांनी या चित्रपटाचे चायनाकन केले आहे. तर लेखन चेतक घेगडमल आहेत.

अवश्य वाचा : ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी सलामी;आरसीबीला नमवले  

हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून मानवंदना- सुनील शेळके (Mahaparinirvan Movie)

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात,’आम्हाला आनंद आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून ही एक मानवंदना आहे. ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते,अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहित नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.अवघी मुंबापुरी यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहणार आहोत’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here