Maharajaswa Abhiyan Camp : संगमनेर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसरामध्ये रविवार (ता. ८) मार्च महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ (Maharajaswa Abhiyan Camp) अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या हस्ते होणार आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार
या शिबिरामध्ये धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, सांगवी, कौठे धांदरफळ, सावरचोळ, धुपे, मेंगाळवाडी व शिरसगाव या गावांतील नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या अभियान शिबिरात प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उतारे वाटप करण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र यांसह विविध दाखले देण्यात येणार आहेत. या शिवाय अकृषिक (NA) परवानगी व तरतुदींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थेनुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी अवश्यक शालेय दाखले यांचाही समावेश आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
विविध सेवांचा एकाच ठिकाणी लाभ मिळणार (Maharajaswa Abhiyan Camp)
तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादन अन अकृषिक परवानगी संदर्भातील ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याचे कामही यावेळी करण्यात येणार आहे. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा एकाच ठिकाणी लाभ मिळणार असल्याने परिसरातील गावांतील नागरिकांनी या महाराजस्व अभियान’ शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.



