Maharashtra : अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

Maharashtra : अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

0
Maharashtra : अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित
Maharashtra : अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

Maharashtra : नगर : सामाजिक (Social) व शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल शिक्षिका तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने (Maharashtra Swabhiman Gaurav Award) सन्मानित करण्यात आले. जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघातर्फे आझाद मैदान येथील पत्रकार भवनात शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ (लखुजी जाधवराव) यांचे सोळावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधव यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

अनिता काळे यांचे सामाजिक क्षेत्रात सक्रीय योगदान

या पुरस्कार सोहळ्यासाठी उद्योजिका संगीता गुरव, मॉडेल स्मिता भोसले-धुमाळ, मुंबई महापालिकेचे माजी महापौर महादेव देवळे, सुभाष गायकवाड, तेजस्विनी गलांडे, स्वागताध्यक्ष देवानंद कांबळे, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी उपस्थित होते.
अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील २५ वर्षांपासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

महिला सक्षमीकरणाचे कार्य (Maharashtra)

त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहीम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here