Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान; २३ नोव्हेंबरला मतमोजणी

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान; २३ नोव्हेंबरला मतमोजणी

0
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान; २३ नोव्हेंबरला मतमोजणी
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान; २३ नोव्हेंबरला मतमोजणी

Maharashtra Assembly Elections : नगर : महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा (Maharashtra Assembly Elections) कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Central Election Commission) प्रमुख राजीव कुमार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार आजपासून (ता. १५) आचारसंहिता (Code of Conduct) जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान (Voting) प्रक्रिया होणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबरला तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

नक्की वाचा: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा

महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र

देशातील महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया होणार आहे. यात ९ कोटी ३ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ ऑक्टोबर रोजी अधीसूचना जाहीर होणार आहे. त्यानंतर २३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया होईल. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत राहील, २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

अवश्य वाचा: महाराष्ट्रातील शेतीला मिळणार मोफत वीज

३ लोकसभा मतदारसंघांत निवडणुकीची शक्यता (Maharashtra Assembly Elections)

निवडणूक आयोग थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीचे हे वातावरण केवळ दोन राज्यांपुरतेच मर्यादित राहणार नसून उर्वरित १३ राज्यांतही पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. तसेच ३ लोकसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार आहे.

हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर व झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीकडून जागा वाटप येत्या पाच ते सहा दिवसांत निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र आठवड्याभरात स्पष्ट होणार आहे.