Maharashtra Bandh : नगर : बदलापूरमधील संतापजनक घटनेच्या (Badlapur School Girls case) निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) जागावाटपाबाबत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. तरी सर्व मतभेद विसरून बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केले आहे.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे
महाराष्ट्र बंदच्या दिवशी या आस्थापना असणार सुरु :-
24 ऑगस्टच्या भारत बंदच्या दिवशी शनिवार आहे. त्यामुळे ते नियमित सुरू राहण्याची शक्यता आहे. पण ज्या शाळा महाविद्यालयांना शनिवार-रविवार सुट्टी असते ते नेहमी प्रमाणे बंदच राहतील.
या महाराष्ट्र बंदला राज्य सरकारचा पाठिंबा नाही. त्यामुळे राज्यातील एसटी, रेल्वे आणि सीटी बस सेवा सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र बंदच्या दिवशी रुग्णवाहिका सुरू राहतील.
मुंबईमधील लोकल, बस आणि मेट्रो नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता
सरकारी कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
अवश्य वाचा: बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल
या आस्थापना राहणार बंद :- (Maharashtra Bandh)
२४ ऑगस्टला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरामध्ये बँका बंद राहतील.
शनिवारी सुट्टी असणारे कार्यलय बंद राहतील.
महाराष्ट्र बंद दरम्यान काही ठिकाणी खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे.
यासह छोटे-मोठे व्यावसायही यामुळे बंद राहू शकतात.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील.
महाराष्ट्र बंद विकृतीविरोधात संस्कृती असा असणार आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळवा. जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे., असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले.