Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award : समता प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक’ पुरस्कार बाबासाहेब गवते यांना प्रदान

Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award : समता प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक' पुरस्कार बाबासाहेब गवते यांना प्रदान

0

Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award: नगर : समता प्रतिष्ठान, महाराष्ट्र (Maharashtra) राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. बाबासाहेब जालिंदर गवते (Prof. Babasaheb Jalindar Gavate) यांना यंदाचा मानाचा महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार (Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award) देऊन गौरविण्यात आले.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल

आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सन्मानित

अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गवते यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गवते यांच्या कार्याचा गौरव (Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award)

Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award : समता प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक' पुरस्कार बाबासाहेब गवते यांना प्रदान
Maharashtra Bhushan Adarsh Shikshak Award : समता प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक’ पुरस्कार बाबासाहेब गवते यांना प्रदान

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सत्यजित तांबे यांनी गवते यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कणा मानली जाते. प्रा. बाबासाहेब गवते यांनी आपल्या ज्ञानदानाबरोबरच कर्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवन आणला आहे. अशा निष्ठावान शिक्षकांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.