Maharashtra Cabinet Expansion : नगर : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पुढील आठवड्यात केला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाअगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाअगोदर २७ जूनला होण्याची शक्यता
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लाेकसभेत चांगली कामगिरी केलेल्या शिलेदारांना मंत्रिपदाची लाॅटरी लागण्याचा अंदाज आहे.
अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक
‘या’ आमदारांची वर्णी लागणार? (Maharashtra Cabinet Expansion)
मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटातून आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि लता सोनावणे यांच्या नावाची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप आणि भाजपकडून आमदार नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे