Maharashtra Cricket Team : नगर: अहिल्यानगर जिल्ह्याचा लौकिक वाढवणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे (Hundekari Sports Academy) दोन खेळाडू प्रेम किरण इघे (Prem Kiran Ighe) आणि स्वामिनी विजय बेलेकर (Swamini Vijay Belekar) यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघांमध्ये (Maharashtra Cricket Team) निवड झाली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल
१५ वर्षांखालील मुलींच्या संघात निवड
२ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधी मध्ये केरळ मधील तिरुवनंतपुरम मध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या १५ वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय स्पर्धेसाठी स्वामिनी विजय बेलेकर हिची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली असून ती महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता
क्रिकेट कौशल्याची दाखवली चुणूक (Maharashtra Cricket Team)
तर प्रेम किरण इघे याची ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत रोहतक (हरियाणा) याठिकाणी झालेल्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली होती. स्वामिनी ही डावखुऱ्या हाताची फलंदाज व मध्यम गती गोलंदाज असून, यापूर्वी तीने १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या संभाव्य संघात स्थान मिळवून आपल्या क्रिकेट कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. ती जळगाव संघाचे प्रतिनिधित्व करते. तेथे तिला सुयश बुरुकुल आणि तन्वीर अहमद यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रेम हा उजव्या हाताचा फलंदाज असून तो उत्कृष्ट यष्टिरक्षक देखील आहे. त्याने आंतरशालेय, आंतरविभागीय आणि आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेमधे उत्कृष्ट कामगिरी करत संघात आपले स्थान निश्चित केले. हे दोन्ही खेळाडू हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमी, अहिल्यानगर येथे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.



