Maharashtra Kesari Kusti Spardha : कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ 

Maharashtra Kesari Kusti Spardha : कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ 

0

Maharashtra Kesari Kusti Spardha : कर्जत : २६ ते ३० मार्च या काळात कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Kusti Spardha) थरार रंगणार आहे. या स्पर्धेत कुठेही राजकीय (Political) हस्तक्षेप अथवा कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. तसेच स्पर्धेला कसलेही गालबोट लागणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली. या स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ आमदार रोहित पवार, महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

Maharashtra Kesari Kusti Spardha : कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ 
Maharashtra Kesari Kusti Spardha : कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ 

नक्की वाचा : दुध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर

अनेक नामांकित कुस्तीपटू उपस्थित

यावेळी अनेक नामांकित कुस्तीपटू उपस्थित होते. कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कुस्तीच्या मैदानाचे पूजन शनिवारी (ता.१५) सकाळी आमदार रोहित पवार, माजी आमदार प्रताप ढाकणे यांच्यासह महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, अहिल्यानगर शहरात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला लागलेले गालबोट संपूर्ण देशाने पाहिले आहे. यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमीमध्ये असंतोष पसरला होता. मात्र, या स्पर्धेत फक्त कुस्तीपटूच्या मैदानातील सर्वोत्तम खेळाच्या जोरावरच निकाली होईल, अशी ग्वाही परिषदेस दिली.

अवश्य वाचा : अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी (Maharashtra Kesari Kusti Spardha)

ज्या खेळाडूंची कुस्ती तांत्रिक निकष पूर्ण करणारी आणि खेळ भावनेसह सर्वोत्तम असेल तसेच तांत्रिक समितीच्या गुणांकनावरूनच स्पर्धेचा विजेता ठरेल, असे स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेणाऱ्या कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य, सभापती यासह सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून कोणतेही राजकीय व्यासपीठ न ठेवता फक्त खेळ भावना लक्षात घेत त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले.

याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सर्वांची आहे. ही स्पर्धा नसून हा कुस्ती पैलवानांचा सोहळा आहे. मैदानात जो सर्वोत्तम खेळ करीन तोच विजयी होईल. त्यामुळे आयोजकांना कस लावावा लागेल. स्पर्धेला गालबोट लागल्यावर काय होते हे मागील स्पर्धेत सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे नियमानुसार आणि पैलवानांच्या खेळानुसार निकाल लागेल. तांत्रिक समितीचे निकष आणि डोळ्यांना दिसणारा खेळ यातच विजेता घोषित केला जाईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, हिंदकेसरी अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, पंच कमिटीचे बंकट यादव, नवनाथ ढमाळ, जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, संभाजी वरुटे, नितीन निंबाळकर यांच्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय पदाधिकारी आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.