Maharashtra Kesari Wrestling Tournament : कर्जत : कर्जत शहरात संत सदगुरु गोदड महाराज (Sant Godad Maharaj) क्रीडा नगरीत बुधवारपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) थरार रंगला असून मागील दोन दिवसात विविध वजनी गटात नोंदणी केलेल्या मल्लांनी नेत्रदीपक आणि उत्कंठा वाढविणारे कुस्ती करीत कुस्ती (Wrestling) शौकिनांची वाहवा मिळवली. तिसऱ्या दिवशी देखील दोन्ही सत्रात ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटात साखळी सामने रंगले.
नक्की वाचा : “देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ऑलिंपिक खेळाडू समजतो”,वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना नितीन गडकरींचा टोला
नामांकित मल्लांचा प्रतिस्पर्धीस धूळ चारीत पुढील फेरीत प्रवेश
बुधवार (ता.२६) पासून कर्जत शहरात दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगल्या असून या स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांत ५७, ६५, ७४ यासह ६१ आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात कुस्त्या रंगल्या. यात कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, मुबंई, पुणे, नागपूर, धाराशिव, सोलापूर, बीड येथील नामांकित मल्लांनी आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी मल्लास धूळ चारीत पुढील फेरीत प्रवेश केला.
अवश्य वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते’; अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा
अनेक मल्लांनी मैदान गाजविले (Maharashtra Kesari Wrestling Tournament)
६१ किलो वजनी गटात अनेक मल्लांनी चुरशीच्या कुस्ती केल्या. मात्र अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या प्रवीण वडगावकर आणि साताऱ्याचा विशाल रुपनवर या लढतीत रुपनवरने बाजी मारीत १४ गुण मिळवत मात दिली. तर माती विभागात पुण्याच्या आविष्कार गावडे आणि कोल्हापूरचा सतीश कुंभार या कुस्तीमध्ये गावडेने ८ गुण मिळवत कुंभारवर विजय संपादन केला. शुक्रवारी देखील स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटात गादी व माती विभागाच्या कुस्त्या झाल्या. यात ७० किलो वजनी गटात साई म्हात्रे (कल्याण), दीपक देवकर (नाशिक), किरण ढवळे (रायगड), दीपक चोरमले (छत्रपती संभाजीनगर), प्रणव जाधव (लातूर), पृथ्वीराज रसाळे (सांगली), साहिल कंठे ( सातारा), ऋषीकेश पवार (सोलापूर) आणि कुलदीप पाटील (कोल्हापूर) या मल्लांनी मैदान गाजविले.
तर ७९ किलो वजनी गटात विनायक शेंडगे (पुणे), राहुल कोरडे (सातारा), प्रणव हांडे (सोलापूर), शिवराज झाजूरणे (नांदेड), पृथ्वीराज वाडकर (मुंबई), गणेश झजुंर्ने (ठाणे), नाथा पवार (सांगली), धुलाजी इरकर (धाराशिव), पावन चौधरी (ठाणे), अक्षय साळवी (कोल्हापूर) आणि रामेश्वर वाघ (बुलढाणा) यांनी बाजी मारली. रात्री उशिरापर्यंत ९२ किलो वजनी गटाच्या कुस्ती सुरू होत्या.