Maharashtra Library Association : राज्य ग्रंथालय संघाचे वर्ध्यात होणार वार्षिक अधिवेशन

Maharashtra Library Association : राज्य ग्रंथालय संघाचे वर्ध्यात होणार वार्षिक अधिवेशन

0
Maharashtra Library Association : राज्य ग्रंथालय संघाचे वर्ध्यात होणार वार्षिक अधिवेशन
Maharashtra Library Association : राज्य ग्रंथालय संघाचे वर्ध्यात होणार वार्षिक अधिवेशन

Maharashtra Library Association : नगर : राज्य ग्रंथालय संघाचे (Maharashtra Library Association) राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन वर्धा (Wardha) येथे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) होणार आहे. तरी वाचन, साहित्य, ग्रंथालय (Library) चळवळीतील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे (The Ahmednagar District Library Association) ज्येष्ठ संचालक पनाजी कदम यांनी केले आहे.

नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय

ज्येष्ठ मान्यवर उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशन १५ व १६ मार्च रोजी महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्ध्यातील सत्यनारायण बजाज जिल्हा वाचनालय येथे होणार आहे. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून खासदार अमर काळे, तर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेवार यांच्या अध्यक्षते खाली होणाऱ्या आहे. या अधिवेशनात राज्य ग्रंथालय संचालक तसेच अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण

उपस्थित राहण्याचे आवाहन (Maharashtra Library Association)

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची शिखर संस्था आहे. या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक सचिव सदाशिव शेळके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष ॲड. आजिनाथ जायभाय, संचालक सुखदेव मोहिते, नामदेव गरड, विष्णुपंत पवार, भाऊसाहेब गवळी, संभाजी पवार, शशिकांत झंझाड, अमोल इथापे, प्रा. बाळासाहेब शेलार, पी.डी. आहेरे पाटील, नवनाथ मस्के, दीपक आगळे, राजेंद्र तरटे, विकास, बांगर, ज्ञानदेव अनारसे, गायकर सर, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपान पवार, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, राम मेखले या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष प्रदीप कुमार बजाज यांनी केले आहे.