Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का

Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का

0
Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का
Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का

विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का : प्रमुख पदांवर विरोधी पॅनेलचा विजय

Maharashtra Sahitya Parishad : पुणे : साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (Maharashtra Sahitya Parishad) (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल झाला. सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलला पराभवाची धूळ चारत साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परिषदेच्या प्रमुख पदांवर विजय मिळवला. एकूण ३१ जागांपैकी २४ जागा विद्यमान सदस्यांना मिळाल्या. तर ७ जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण (Yogesh Soman) विजयी झाले. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक (Swati Mahalank) तर कोषाध्यक्ष पदी प्रदीप निफाडकर (Pradeep Niphadkar) विजयी झाले.

नक्की वाचा : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

10 हजार 901 सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या कार्यालयात मतमोजणीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरूवात झाली. रात्री 9. 30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत ‘मसाप’चे १६ हजार ६०७ मतदार होते. यापैकी 10 हजार 901 इतक्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण वैध मते 10 हजार 713 तर 188 मते अवैध ठरले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

दोन्ही पॅनेमध्ये अखेरपर्यंत चुरस (Maharashtra Sahitya Parishad)

मतमोजणीत उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन या दोन पॅनेमध्ये अखेरपर्यंत चुरस पहायला मिळाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये करोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती.

मतमोजणीला सकाळपासूनच 7 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात विश्रामबाग पोलिस ठाण्याचे 3 पोलीस आणि 4 होमगार्ड यांचा समावेश होता.

प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. जिल्हा व शहर कार्यवाह पदासाठी 1 हजार 506 सदस्यांनी मतदान केले. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. 8 फेऱ्यापर्यंत हेच पॅनल १३००/१४०० मतांनी आघाडी होते. शेवटच्या काही फेऱ्यात मताधिक्य कमी झाल्याने उमेदवारांची धडधड वाढली.

निवडून आलेले उमेदवार
अध्यक्ष : योगेश सोमण

प्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंक

कोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर

Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का
Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट; विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का

जिल्हा प्रतिनिधी
सातारा : नंदकुमार सावंत
अलका बेडकीहाळ
अमर सिह पाटणकर
सोलापूर : पद्माकर कुलकर्णी
कल्याण शिंदे
डॉ. श्रुती वडगबाळकर
सांगली : दीपक स्वामी
कोल्हापूर : राजन मुठाणे
कोकण : अरुण इंगवले
नशिक : उन्मेश गायधनी
प्रकाश होळकर
अहिल्यानगर : जयंत येलूलकर,
डॉ. गणेश भगत
जळगाव : डॉ. वासुदेव वले,
गणेश आढाव
ठाणे : सुरेश देशपांडे,
भिकू बारस्कर
पुणे : राजन लाखे,
पुरूषोत्तम काळे,
प्रभाकर ओव्हाळ

धुळे-नंदुरबार : प्राचार्य संजीव गिरासे

स्थानिक कार्यवाह :
सुनील महाजन
अंजली कुलकर्णी
सुनेत्रा मंकणी
प्रसाद मिरासदार
माधव राजगुरू
नितीन संगमनेरकर

आशुतोष जावडेकर

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
अध्यक्ष : योगेश सोमण : 5 हजार 365
प्रा. मिलिंद जोशी : 5 हजार 320

मताधिक्य : 45

प्रमुख कार्यवाह
स्वाती महाळक : 5 हजार 414
सुनीताराजे पवार : 5 हजार 285

मताधिक्य : 129

कोषाध्यक्ष
प्रदीप निफाडकर : 5 हजार 536
विनोद कुलकर्णी : 5 हजार 168
मताधिक्य : 368