Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana : ‘महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजने’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : उमेश पाटील

Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana : 'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजने' साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : उमेश पाटील

0
Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana : 'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजने' साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : उमेश पाटील
Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana : 'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजने' साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : उमेश पाटील

Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana : नगर : महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना’ (Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव १० डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन (District Animal Husbandry) उपायुक्त डॉ. उमेश पाटील (Dr. Umesh Patil) यांनी केले आहे.

नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन

संस्था व व्यक्तींच्या कार्याचा गौरव

महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सन २०२५-२६ या वर्षापासून दरवर्षी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन

पुरस्कारांचे स्वरूप : (Maharashtra Shudh Desi Govansh Samman Yojana)

पहिला पुरस्कार: आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधून एका गोशाळेची निवड केली जाईल.
दुसरा पुरस्कार: शासकीय/खासगी गोवंश संवर्धन संस्था, गोवंश प्रक्षेत्रे, कृषी विद्यापीठे, पशुवैद्यक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी पशुपालक समूह गट किंवा वैयक्तिक गोपालक यांच्यातून एकाची निवड केली जाईल.
निवड झालेल्या संस्थांना प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
निवडीचे निकष : पुरस्कार निवडीसाठी संस्थेचे किंवा व्यक्तीचे मागील पाच वर्षांतील कार्य पाहिले जाईल. यामध्ये आत्मनिर्भर गोशाळा, शुद्ध गोवंश पैदास, प्राकृतिक शेतीचा प्रसार, गो-उत्पादनांची निर्मिती, आणि बायोगॅस/सौरऊर्जा वापर यांसारख्या विविध निकषांवर गुणांकन केले जाईल.

प्रस्ताव सादर करण्याचे ठिकाण

इच्छुक व पात्र संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव १० डिसेंबर २०२५ पर्यंत ‘जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, अहिल्यानगर’ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती कार्यालयात उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.


जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र संस्था व गोपालकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.