
Maharashtra State Electricity Workers Federation : नगर : महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (Maharashtra State Electricity Workers Federation), अहिल्यानगर तर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी (District Collector) कार्यालयात निवेदन (Statement) सादर करण्यात आले.
नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
जुन्या पेन्शन योजनेची मागणी
या निवेदनात जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, केंद्र सरकारने खाजगीकरण थांबवावे तसेच वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण क्षेत्रासाठी नवीन त्रिपक्षीय समिती स्थापन करून एकत्रित करावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्रातील वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी, महावितरण V/R-2030 दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रद्द करावी तसेच ३२९ उपकेंद्रे खाजगी कंत्राटदारांना देण्यासाठी जारी केलेल्या निविदा तात्काळ रद्द कराव्यात, अशा मागण्या नोंदवल्या आहेत.
अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’
कंत्राटीकरणाला विरोध (Maharashtra State Electricity Workers Federation)
महावितरण कंपनीतील वाढत्या कंत्राटीकरणाला तीव्र विरोध दर्शवून तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरावीत, वर्ग १ ते ४ पर्यंत भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. वीजक्षेत्रातील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या अधिवेशनात पारित ठरावांनुसार हे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन सादर करण्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन उपचिटणीस तथा नायब तहसीलदार (गृह शाखा) मा. मच्छिंद्र बेरड यांना देण्यात आले.
निवेदन सादरीकरणावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधाने, माजी झोन सचिव रविकांत सरोवरे, नाशिक झोन अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, सर्कल अध्यक्ष अनिल नजन, सर्कल सचिव गणेश कुंभारे, राहुल वरघंटे, गोरख हरिहर, गणेश वाडेकर, सौ. धरती घबाडे, किरण गायकवाड, सुनील तरटे यांच्यासह झोन, सर्कल व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.


