Maharashtra Swarajya Party : संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

Maharashtra Swarajya Party : संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

0

Maharashtra Swarajya Party : नगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Elections) संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या स्वराज्य संघटनेने (Swaraj Sanghatna) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्याच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ (Maharashtra Swarajya Party) म्हणून मान्यता दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात माहिती दिली.

नक्की वाचा : भाऊबीजेलाही बहिणींना मिळणार ओवाळणी;अजित पवारांचा वादा

‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह

“तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल”, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Swarajya Party : संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!
Maharashtra Swarajya Party : संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

अवश्य वाचा : ‘राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र,त्यांची बुद्धीही बैलाचीच’-संजय राऊत

पक्ष व पक्षचिन्ह जनतेपर्यंत पोहोचवा (Maharashtra Swarajya Party)

अनेकांनी मला शक्य त्या सर्व माध्यमातून सांगितलं की संभाजीराजे, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर आणि आभार व्यक्त करतो. हीच भावना आमच्याबद्दल राहू द्यावी”, असं ते म्हणाले होते. “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्हदेखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल”, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here