Maharashtra Unseasonal rain : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता 

आजपासून राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

0
महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता

नगर : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal rain) संकट घोंगावत आहे. आजपासून राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईला येत्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईला यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘डंकी’ सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऐन  रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे.

हेही वाचा : व्हॉट्सॲप युजर्ससाठी नवीन फिचर येणार

रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याला २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर,तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अनेक  ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here