Maharashtra Voting Percentage : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात  ‘इतके’ मतदान

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये ५७. ४९ टक्के इतके मतदान झालं आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालना लोकसभेमध्ये झालं.

0
Maharashtra Voting Percentage
Maharashtra Voting Percentage

नगर : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) चौथा टप्पा राज्यात पार पडला. या चौथ्या टप्प्यातही राज्याचा मतदानाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये ५७. ४९ टक्के इतके मतदान झालं आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालना लोकसभेमध्ये (Jalna Loksabha) झालं. तर जालन्यामध्ये ६८. ३० टक्के मतदान झालं. तर पुण्यात सर्वात कमी म्हणजे ४९. ४३ टक्के मतदान झालं.

नक्की वाचा : मुंबईत तुफान वादळ

राज्यातील २४ मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान (Maharashtra Voting Percentage)

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये राज्यातील २४ मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. सोमवारच्या मतदानाचा कल पाहता चौथ्या टप्प्याची आकडेवारीही याच आसपास राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघांत किरकोळ अपवाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, शरद पवार गटाचे उमेदवार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह एकूण २९८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले आहे. भाजपचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये तर वंचितचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी शिरूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

अवश्य वाचा : श्रीरामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे मतदान

कला क्षेत्रातील मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क (Maharashtra Voting Percentage)

जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याणराव काळे अशी लढत आहे. तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात लढत आहे. नागरिकांसह कला क्षेत्रातील मंडळींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, गायिका आर्या आंबेकर, सलील कुलकर्णी आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here