Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन थंडीचा कडाका वाढेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

0
Cold Climate

नगर : मागील काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळाली आहे. पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन थंडीचा कडाका (Cold) वाढेल,असा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान (Maharashtra Weather Update) कोरडे राहणार आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नक्की वाचा : देशावर अवकाळी पावसाचं संकट कायम  

राज्यात बुधवारी (ता.10) पावसाने चांगली हजेरी लावली. कोकणात आणि रत्नागिरीमध्ये 0.5 मीमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये 7.8 मीमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये 0.5 मीमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात 0.2 तर नागुपरात 0.3 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

अवश्य वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!

आजपासून (ता.11) पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होऊन कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान किमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here