Weather Update : मान्सूनचे (Maharashtra Weather Update) महाराष्ट्रात लवकरच आगमन झाले आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (Aviation Department) व्यक्त केला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नक्की वाचा : ‘आंदोलन मोडायच्या मागे लागू नका’;मनोज जरांगे कडाडले
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात आयएमडीने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सरी पाहायला मिळाल्यात. त्यामुळे आता नागरिकांचे डोळे मान्सून कडे लागले आहेत. सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात सगळीकडे दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Maharashtra Weather Update)
आज जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल.
अवश्य वाचा : वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून;ट्रेलर लाँच
देशात सध्या ऊन-पाऊस असा वातावरणाचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील जनता उष्णतेच्या झळांनी त्रस्त आहे. दुसरीकडे केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू देश व्यापणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो संपून आता ला निनो सुरु होणार आहे. यामुळे यंदा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.