Maharashtra weather update: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?

0
Maharashtra weather update: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?
Maharashtra weather update: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?

नगर : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. गेल्या काही आठवड्यांपासून अधून मधून सुरू असलेल्या पावसानंतर अखेर मुंबईसह, विदर्भ मराठवाड्यात थंडीची चाहूल (A hint of cold) लागणार आहे. भारतीय व हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ६ ते ७ नोव्हेंबरपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान ४ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात बदल जाणवणार आहे. मात्र पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण व गोवा भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 नक्की वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन   

हवामान विभागाचा अंदाज काय? (Maharashtra weather update)

भारतीय हवामान केंद्राने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर घोंघावणाऱ्या  चक्राकार वाऱ्यांची स्थिती धूसर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. पुढील २४ तासात महाराष्ट्रात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घटणार आहे.  

अवश्य वाचा:  ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरवात   

पुढील दोन दिवसात तापमानात हाेणार घट (Maharashtra weather update)

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई उपनगरासह कोकणपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. त्यामुळे हवेत आर्द्रता व ओलावा कायम होता. आज मुंबई ,ठाणे, रायगडसह मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. ७ नोव्हेंबरपासून हवामान शुष्क होत जाणार असून पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत अंशतः ढगाळ हवामान राहणार असून दिवसा उकाडा जाणवेल. तर पहाटेच्या वेळी हवेत गारवा राहील.