Mahashivratri : अकोले : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) अकोले तालुक्यातील भाविकांचे आराध्य दैवत असणार्या श्री अगस्ती ऋषी (Agastya Rishi) आश्रमात लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गुरुवारी (ता.७) रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे तीन वाजता मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. पौरोहित्य मोरेश्वर धर्माधिकारी यांनी केले.
हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रीघ (Mahashivratri)
यावेळी नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, उद्योजक मुजुमदार, योगी केशव बाबा चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. दुपारी उन्हाची तीव्रता असल्याने गर्दीचा ओघ काहीसा कमी झाला होता. ऊन कमी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी अगस्ती ऋषींचे दर्शन घेतल्याचा अंदाज देवस्थान ट्रस्टने व्यक्त केला आहे. यानिमित्त मंदिर परिसरात दोन दिवस यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी भाविक भक्तांचे स्वागत केले. देवस्थान ट्रस्ट व अर्पण ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार
भाविकांना फराळ वाटप (Mahashivratri)
यात्रेच्या नियोजनासाठी देवस्थानचे अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, खजिनदार किसन लहामगे, विश्वस्त पर्बत नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, बद्रीनाथ मुंदडा, अनिल गायकवाड, सतीश बूब, रामनिवास राठी, महेश सारडा, रामेश्वर रासने, बाळासाहेब भोर, रमेश नवले, नवनाथ गायकवाड, मच्छिंद्र भरीतकर, मधुकर वाकचौरे, बाळासाहेब घोडके, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक आदींनी परिश्रम घेतले. माजी आमदार वैभवराव पिचड मित्रमंडळ, चंद्रभान मेहेर, गोरक्ष आरोटे व टाकळी ग्रामस्थ यांच्यावतीने भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. विविध संस्था व सामाजिक संघटनांच्यावतीने भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शन घेतले.