Mahashivratri | महाशिवरात्री निमित्ताने अगस्ति आश्रमात भाविकांची गर्दी

पहाटेपासून भाविकांनी  दर्शनासाठी गर्दी

0

Mahashivratri | अकोले: तालुक्याचे आराध्य दैवत अगस्ति आश्रमात महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पर्वानिमित्ताने यंदा अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी अगस्ति ऋषींच्या दर्शनाचा लाभ घेतला. याशिवाय तालुक्यातील अनेक मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सवही भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
अगस्ति आश्रमात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. यंदाही हा उत्सव चार दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, रविवारी पहाटे तीन वाजता विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, आमदार डॉ. किरण लहामटे त्यांच्या पत्नी पुष्पा या जोडींच्या हस्ते ऋषींची  सपत्नीक महापूजा करण्यात आली. मोरेश्‍वर धर्माधिकारी यांनी महापूजेचे पौराहित्य केले. देवस्थानचे अध्यक्ष वकील के. डी. धुमाळ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगी केशव बाबा चौधरी, नगर विकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी, सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद, खजिनदार किसन लहामगे, विश्‍वस्त गुलाबराव शेवाळे, पर्बत नाईकवाडी, दीपक महाराज देशमुख, बाळासाहेब भोर, भानुदास तिकांडे, व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचाअपयशाने न खचता स्पर्धेत जो टीकतो तोच खरा विद्यार्थी : गिरीश महाजन

पहाटेपासून भाविकांनी  दर्शनासाठी गर्दी (Mahashivratri)

महापूजेनंतर चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासून भाविकांनी  दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरातील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वीरगावहून पायी पालखी सोहळ्यात चारशेच्यावर भाविक पायी चालत येऊन त्यांनी ऋषींचे दर्शन घेतले. यंदा महाशिवरात्र व सोमवती अमावस्या म्हणून चार दिवसांची यात्रा ठेवण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले, स्वयंसेवी संस्था यांनी शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली होती. तर शिवसेनेच्यावतीने फराळ वाटप करण्यात आले.