Mahatma Phule : अहिल्यानगर : थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जीवनावरती नुकताच सिनेमा येणार आहे. महात्मा फुले (Mahatma Phule) व सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जीवनपट साकारणारा ‘फुले’ हा चित्रपट (Phule Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, ‘फुले’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध दर्शवला जात आहे. फुले चित्रपटातील काही दृष्यांना एका समाजाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाकडूनही (Censor Board) या चित्रपटातील अनेक दृष्यांना कात्री लावण्यात आली आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात त्यांनी आज आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नक्की वाचा : आरोग्य सेवेचे सशक्तीकरण ‘मिशन मोड’वर
काही दृष्ये हटवण्याचा सेन्सॉर बोर्डाचा निर्णय
महात्मा फुलेंवरील आगामी सिनेमातील काही दृष्ये हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलाय. या विरोधामुळे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून महात्मा फुले वाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : रामनवमी मिरवणूक; मंडळ पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द गुन्हा
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, (Mahatma Phule)
काहींचा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेल्या क्रांतीला अजूनही विरोध चाललेला आहे. फुले चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सॉर बोर्ड हे जर आपला विरोध असाच ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाची जे मेंबर आहेत, त्यांच्या घरासमोर आम्ही निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण की, त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे हीच या देशांमध्ये राबवली जाईल, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.