
Mahatma Phule Jayanti : नगर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule Jayanti) यांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. माळीवाडा (Maliwada) येथे लवकरच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नगरकरांना प्रेरणा मिळत राहील. संत-महापुरुषांच्या विचारांतून समाजाला चांगल्या कार्याची प्रेरणा मिळते, असे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी नमूद केले.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोष करत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार जगताप म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महात्मा फुले यांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे (Mahatma Phule Jayanti)
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव सुरू करून छत्रपतींचा इतिहास समाजासमोर आणण्याचे कार्य केले. तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून समाजजागृती केली. त्यांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. या कार्यक्रमास प्रा. माणिकराव विधाते, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सुरेश बनसोडे, दत्ता गाडळकर, नगरसेविका सुजाता पडोळे, रेणुका पुंड, ओबीसी सेलचे नितीन घोडके, फुले ब्रिगेडचे किरण जावळे, किरण मेहेत्रे, संकेत लांडे, अवधूत फुलसौंदर, ब्रिजेश ताठे, सुरत शिंदे, योगेश एरंडे, रोहित पठारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


