Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा

0
Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा
Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : राहुरी: येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) कुलसचिव पद वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या पदावर दोन जणांनी दावा केल्याने विद्यापिठ प्रशासनाची (University Administration) चांगलीच भंबेरी उडाली. 

नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

डॉ. मुकुंद शिंदे यांचा आपला पदभार संभाळण्यास नकार

याबाबत सविस्तर माहिती अशी, तत्कालीन प्रभारी कुलसचिव विठ्ठल शिर्के यांच्या जागेवर राज्य शासनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरुण आनंदकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राज्य शासनाने डॉ. आनंदकर यांना हटवून त्या जागी डॉ. मुकुंद शिंदे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला डॉ. आनंदकर यांनी मॅट कोर्टात आव्हान दिले. मॅट कोर्टात डॉ. आनंदकर यांनी भक्कम बाजू मांडली. त्यानंतर मॅट कोर्टाने डॉ. आनंदकर यांची नियुक्ती कायम ठेवली. यानंतर हा आदेश घेऊन डॉ. आनंदकर विद्यापीठातील आपल्या पुर्वीच्या दालनात गेले असता सध्या कुलसचिव पदावर असलेले डॉ. मुकुंद शिंदे यांनी आपला पदभार संभाळण्यास नकार दिला.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा
Mahatma Phule Krishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर दोघांचा दावा

कुलूप लावल्याने काल दिवसभर दालन बंद (Mahatma Phule Krishi Vidyapeeth)

यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. त्यानंतर प्रशासनाने दोघांचीही दालनात बसण्याची सोय केल्याने राहुरी विद्यापीठाचा कारभार आता दोन कुलसचिव पाहणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. काही वेळानंतर डॉ. आनंदकर बाहेर गेले असता डॉ. शिंदे यांनी दालन कुलूप लावल्याने काल दिवसभर हे दालन बंद असल्याची माहिती मिळते.