Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट

0

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : राहुरी : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेमार्फत कृषी विद्यापीठ परिसरात पक्षी (Bird) गणना करण्यात आली. पक्षी गणनेचे हे सलग अकरावे वर्ष होते. यंदा 4096 पक्षी आढळले. गतवर्षीच्या पक्षीगणनेत ४१७१ पक्षी आढळले होते. यंदा पक्षी संख्येत ७५ ने घट झाली आहे. राष्ट्रीय पक्षी मोराच्या संख्येत 65 ने वाढ झाली. यंदा 90 मोर आढळून आले. घार, घुबड, चिमणी यांच्या संख्येत घट झाली तर कावळा, पोपट, साळुंकी, बुलबुल यांच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक वर्षात जानेवारी महिन्यात पक्षी गणना (Bird Count) केली जाते. त्यासाठी तेरा ठिकाणे निश्चित केली जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) परिसर, शालेय परिसर, धर्माडी टेकडी, देशमुख वस्ती शेडगे वस्ती, मुळा धरण पूर्व व पश्चिम कालवा, फार्म कॉटर, सडे रोड आदींचा समावेश असतो.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट
Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट

नक्की वाचा : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार;उड्डाण मंत्रालयाचा निर्णय

डॉ. महानंद माने यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विविध उपक्रम

सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून विद्यापीठ परिसरामध्ये 51 विद्यार्थिनी व 65 विद्यार्थी, 8 अध्यापक व पालक असे मिळून 129 जणांनी पक्षी गणनेत  सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना निसर्ग जवळून अनुभवता यावा, पक्षांची ओळख व्हावी आणि पक्षांबददल  मनात प्रेम निर्माण व्हावे या हेतून हरित सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. पक्षी गणनेत भल्या सकाळी पक्षांची रंगीबेरंगी दुनिया पाहून विद्यार्थी भारावून गेले. फोटो काढून, डोळ्यात साठवून त्यांनी आठवणी जपल्या. सर्वांचे आकर्षण होते, किंगफिर्शर अर्थात खंड्या. कृषी विद्यापीठात पक्षांची संख्या चांगली आहे. विविध बागा, पाटपाणी आणि शिकारी पासून संरक्षण यामुळे पक्षांना कृषी विद्यापीठ म्हणजे एक सुरक्षीत अभयारण्य आहे.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट
Mahatma Phule Krishi Vidyapeeth : पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट

अवश्य वाचा : सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

या उपक्रमाचे  कौतुक (Mahatma Phule Krishi Vidyapeeth)

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, डाॅ. प्रमोद रसाळ, डॉ. महानंद माने, महेश घाडगे, प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा. जितेंद्र मेटकर आदींनी या उपक्रमाचे  कौतुक केले. हरित सेनेचे सचिव तुकाराम जाधव यांनी नियोजन केले. गटप्रमुख म्हणून अनुष्का  शिंदे, मानसी  जोहरे, श्रेया  ताकटे,  कार्तिकी मोगल, ओंकार कोराळे, श्रवण साळुंके,हिमेश थिगळे, प्रथम जावळे, विनायक जाधव, कार्तिकी सोनवणे, मृणाल ननवरे, गौरव पठारे, सार्थक ढगे यांनी काम केले. संतोष जाधव, वंदना भांगरे, गोकूळ ठाकूर, संदीप कुंभारे, अविनाश यादव, संतोष जाधव, पालक डॉ. रविंद्र आंधळे आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.