Mahatma Phule Krishi Vidyapeeth : राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2025 स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पटकावला द्वितीय क्रमांक

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2025 स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पटकावला द्वितीय क्रमांक

0

Mahatma Phule Krishi Vidyapeeth : राहुरी : राजभवनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 21 व्या महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव इंद्रधनुष्य-2025 (Indradhanushya Youth Festival 2025) या स्पर्धा 5 ते 9 नोव्हेंबर, 2025 या कालावधीमध्ये जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Bahinabai Chaudhari North Maharashtra University) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) संघाला नाट्य विभागातील मूक अभिनय या कलाप्रकारात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

47 विद्यार्थ्यांचा संघ सहभागी

सदरचा पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 47 विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व संघासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, संघ व्यवस्थापक डॉ. सचिन डिंगरे, सांस्कृतिक समन्वयक तथा प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, संघ व्यवस्थापिका डॉ. क्रांती पाटील व चांगदेव दातीर यांचे अभिनंदन केले आहे.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

युवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव (Mahatma Phule Krishi Vidyapeeth)

इंद्रधनुष्य या स्पर्धा युवा विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यातून कलाकार घडविण्यासाठी राजभवनाद्वारे दरवर्षी विविध विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात येतात. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण 26 कृषी व अकृषी विद्यापीठांचे एकूण 1400 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 28 विविध कलाविष्कारांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.