
नगर: भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारावर आधारित ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha Movie) हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत दाखल (Entering the Oscar race) झाला आहे. सर्वोत्कृष्ट ‘ॲनिमेटेड फिचर फिल्मस’ (Best Animated Feature Film) या श्रेणीमध्ये जगभरातील इतर ३५ चित्रपटांसाठी निवड झालेल्या फिल्म्समध्ये महावतार नरसिंहही असेल. हा चित्रपट इतर पाच चित्रपटांशी स्पर्धा करेल.
नक्की वाचा: बॉलिवूडचा ‘ही मॅन’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ या पौराणिक ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत २५१. ३० कोटी तर जगभरात तब्बल ३२६.८२ कोटींची कमाई केली. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲनिमेटेड चित्रपटांचा विक्रम या एकट्या चित्रपटाने मोडला आहे. आता १६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या ९८ व्या अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्करसाठी संपूर्ण देशाची आशा या चित्रपटावर आहेत. ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाला ऑस्करच्या ॲनिमेटेड पिक्चर फिल्म्स या श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातील ३५ शक्तिशाली चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती
ऑस्कर पात्रता कशी मिळाली ? (Mahavatar Narsimha Movie)
महावतार नरसिंह हा चित्रपट अमेरिकेतील क्वालिफाइड कमर्शियल थेटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ऑस्करच्या पात्रतेत आला. ऑस्कर पात्रतेच्या नियमानुसार,अमेरिकेत याच ठिकाणी दिवसातून किमान ३ वेळा आणि सलग ७ दिवस चित्रपट दाखवणे आवश्यक आहे. त्यातील एक शो सायंकाळी ६ ते रात्री १० या प्राईम टाईममध्ये स्लॉट असणे आवश्यक आहे. हे सर्व निकष पूर्ण केल्यानंतर चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले.
महावतार नरसिंह ही फिल्म भगवान विष्णूंच्या वराह आणि नरसिंह या दोन अवतारांची महाकथा आहे. होम्बले फिल्मस्टच्या बॅनर खाली बनवलेला हा महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिला भाग आहे. थिएटरनंतर हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे.
५ आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी कडवी टक्कर (Mahavatar Narsimha Movie)
ऑस्करच्या शर्यतीत ‘महावतार नरसिंह’ चित्रपटासमोर पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट असतील. हे चित्रपट जागतिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असल्याने महावतार नरसिंह समोर तगडी स्पर्धा राहणार आहे.
1) k-pop demon hunters
2) zootopia 2
3) elio
4) demons layer infinity castle
5) Ne Zha 2


