Mahavir Jayanti : नगर : भगवान महावीर यांनी जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला. दया, करुणा, वात्सल्याची शिकवण त्यांनी दिली. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण त्यांना अभिप्रेत होते. त्यामुळे भगवान महावीर यांची जयंती (Bhagwan Mahaveer) (जन्मकल्याणक) उत्साहात साजरी करताना सकल जैन समाजाने (Sakal Jain Samaj) मिरवणुकीत शिस्त पाळावी. मिरवणूक मार्गावर सरबत, थंड पेयं, बिस्किटे वाटल्याने मिरवणूक विस्कळीत होते. प्लास्टिकचे ग्लास, रिकामे पाऊच रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे कचरा होतो, घाण होते. या सर्व गोष्टी टाळाव्यात आणि प्रसाद वाटप मिरवणुकीच्या शेवटी आनंदधाम परिसरातच करावे. सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी म.सा. (Adarsh Rishiji M.S.) यांनी केले.
अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू
दरवर्षी प्रमाणे भव्य मिरवणुकीचे आयोजन (Mahavir Jayanti)
भगवान महावीर जयंती (जन्म कल्याणक) निमित्त रविवारी (ता. २१) नगरमध्ये सकल जैन समाजातर्फे दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रम तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात धार्मिक परीक्षा बोर्ड येथे बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा., आलोकऋषीजी म.सा. आदी साधू साध्वीजी तसेच जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, दिगंबर जैन समाजाचे महावीर बडजाते, नरेंद्र लहाडे, मदनलाल कोठारी, सचिन डुंगरवाल, अजय गंगवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप
सहभागी होण्याचे आवाहन (Mahavir Jayanti)
भगवान महावीर जयंती मिरवणूक मार्ग, या मार्गावरील स्वच्छता, भाविकांचा सहभाग अशा विविध विषयांवर उपस्थित प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. कुंदनऋषीजी म. सा., आदर्शऋषीजी म.सा. यांनी भगवान महावीर यांची शिकवण सांगून मिरवणुकीबाबत मौल्यवान सूचना व मार्गदर्शन केले. तसेच भगवान महावीर जयंती दिनी मिरवणुक, धार्मिक बोर्डावरील प्रवचन, गौतम प्रसादी असे सगळे कार्यक्रम होईपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांनी आपले दुकाने, व्यवहार बंद ठेवून कार्यक्रमात आवर्जून सहभाग नोंदवत सकल जैन समाजाने एकजूट दाखवून द्यावी तसेच सायंकाळी ७ वाजता आनंदधाम येथे आयोजित भक्ती संध्या कार्यक्रमालाही सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आदर्शऋषीजी म.सा. यांनी यावेळी केले.