
Mahavir Jayanti : कर्जत : जैन मुनींवरील हल्ल्याचा निषेध करीत मंगळवार, उद्या (ता. ३१) रोजी महावीर जयंती (Mahavir Jayanti) आहे. त्यामुळे कर्जत आणि राशीन मधील कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीचे निवेदन येथील जैन बांधवांच्या (Jain Community) वतीने कर्जत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध
मालेगाव व धुळे तालुक्यात अलीकडील काळात जैन मुनींची झालेली विटंबना आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात संतापाची लाट असून संबंधित घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी कर्जत आणि राशीन येथील जैन समाज बांधवांनी केली. यासह तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ३१ मार्च हा दिवस “अहिंसा दिन” म्हणून पाळला जातो. या पवित्र दिनी कर्जत शहर आणि तालुक्यात प्राणी हत्या होऊ नये तसेच मांस विक्रीची दुकाने व कत्तलखाने पूर्णतः बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी तालुका प्रशासनास यावेळी करण्यात आली. भारतीय जैन संघटना कर्जत शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित (Mahavir Jayanti)
यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद शहा, विजय खाटेर, माजी नगरसेवक अभय बोरा, ॲड अशोक कोठारी, काकासाहेब धांडे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नीलेश बोरा, उपाध्यक्ष दीपक शहा, सचिव सुमित खाटेर, विशाल बलदोटा, विनोद छाजेड आदी उपस्थित होते.


