Mahavir Jayanti : पाथर्डी : सकल जैन (Jain) बांधवांच्या वतीने पाथर्डी (Pathardi) शहरात भगवान महावीर जयंती (Mahavir Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील नवी पेठ येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भगवान महावीर स्वामींची आकर्षक प्रतिमा रथात विराजमान करण्यात आली होती. ढोलपथक, बँडपथक, लेझीम पथक, राजस्थानी नृत्य तसेच बहुमंडळ व कन्यामंडळ यांच्या विविध धार्मिक व सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. संपूर्ण मार्गावर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी आमदार मोनिका राजळे, ॲड. प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, नगरसेवक नंदकुमार शेळके, डॉ. शारदा गर्जे, बजरंग घोडके,अमोल गर्जे, डॉ. जगदीश मुने, अॅड. प्रतीक खेडकर, देवा पवार, योगेश रासने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन (Mahavir Jayanti)
मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी तसेच बुधवारी (ता. १) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठ, कोरडगाव चौक, नाईक चौक, अजंठा चौक, मेन रोड मार्गे शोभायात्रेचा समारोप जैन स्थानक येथे करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यानंतर जैन स्थानकात जय महाराज, राज महाराज व समीक्षा महाराज यांच्या उपस्थितीत व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. तसेच प्रितेश व रितेश पटवा परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यांची उपस्थिती
यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, तिलोक जैन, संस्थेचे सचिव सतीश गुगळे, सुरेश कुचरिया, सोनू गुगळे, आनंदकुमार चोरडिया, संतोष पटवा, संजीव शेट्टी, डॉ. अभय भंडारी, डॉ. सचिन गांधी, सुनील गांधी, राजेंद्र बाफना, सुरेश गुगळे, रतीलाल पटवा, राजेंद्र मुथा, चांदमल देसरडा, रायचंद गटागट, सचिन भंडारी, राजेंद्र भंडारी, अनिल खाटेर, फुलचंद कांकरिया, प्रदीप वरखेडकर, अभिषेक अन्नदाते, प्रमोद भंडारी, रायचंद रेदासनी, अल्पेश भंडारी, आनंद लुणावत, अमृत चोपडा, साहिल लुणावत आदी उपस्थित होते. प्राचार्य अजय भंडारी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मिरवणुकीदरम्यान जैन युथ फेडरेशनतर्फे दूध व कॉफीचे वाटप करण्यात आले, तर गुंदेचा परिवाराच्या वतीने पाणी व शरबत वाटप करून सेवा करण्यात आली.



